सामाजिक

मार्च महिन्यात पत्रकार संघाचा बीडमध्ये राज्यस्तरीय मेळावा..! विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तिमत्त्वांनी पुरस्कारासाठी संपर्क साधावा 

बीड/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चा बीड येथे मार्चमहिन्यात राज्यव्यापी मेळावा घेण्यात येणार आहे.या मेळाव्यामध्ये पत्रकार संघाच्या वतीने बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार व्यक्तिमत्वाला मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या करिता विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तिमत्त्वांनी पुरस्कारासाठी संपर्क साधावा असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी आणि महिला बीड जिल्हाध्यक्ष शेख आयेशा यांनी केले आहे.

बीड येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचा पहिल्यांदाच राज्यव्यापी मेळावा मार्च महिन्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे.या राज्यव्यापी मेळाव्याला महाराष्ट्रातील आयडॉल असलेले व्यक्तिमत्व प्रमुख अतिथी म्हणून लाभणार आहेत.यासह पत्रकार संघाचे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते बीडजिल्ह्यातील विविध क्षेत्रांमधील कर्तबगार व्यक्तिमत्त्वांना आणि त्याचबरोबर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक कर्तबगार व्यक्तिमत्व आणि एक कर्तबगार व्यक्तिमत्व असलेल्या पत्रकाराला या राज्य स्तरीय मेळाव्यामध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या पुरस्कारा साठी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तिमत्त्वांनी आपल्या संपूर्ण सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती यांनी माहिती फोटो सहीत व्हाट्सअप नंबर ७०३०१४९३२२ यावर पाठवून पुरस्कारा साठी संपर्क साधावा असे आवाहन मिळाव्याचे आयोजक पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी आणि महिला बीड जिल्हाध्यक्ष शेख आयेशा यांनी केले आहे.

विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांनी संपर्क साधावा बीड जिल्ह्यात विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्तबगार महिलांना या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये गौरवान्वित करण्यात येणार आहे. यासाठी विविध क्षेत्रातील यशस्वी झालेल्या महिलांनी आपल्या संपूर्ण माहितीसह ७०३०१४९३२२ या व्हाट्सअप नंबर वर पुरस्कारासाठी माहिती पाठवावी असे आवाहन पत्रकार संघाच्या महिला बीड जिल्हाध्यक्ष शेख आयेशा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!