सामाजिकसांस्कृतीक

तांबवा येथील ज्येष्ठ शाहीर तुकाराम ठोंबरे यांना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सांस्कृतिक पुरस्कार प्रदान 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील तांबवा येथील रहिवासी असलेले  महाराष्ट्रातील लोककला शाहिरी आणि समाज प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये गेल्या ४५ वर्ष पासून सातत्याने कार्य करणारे जेष्ठ शाहीर तुकाराम गिनाजी ठोंबरे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०२४ सालचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार मुंबई येथील रवींद्रनाथ टागोर नाट्य मंदिर या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला ज्येष्ठ कलावंत शाहीर तुकाराम ठोंबरे पद्मिनी ताई तुकाराम ठोंबरे व छबुताई अंधारे हे हा पुरस्कार स्वीकारण्या करिता उपस्थित होते या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह,शाल, श्रीफळ व रोख रक्कम तीन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

हा पुरस्कार सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व मुंबईचे पालकमंत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला असंख्य कलावंता च्या सानिध्यातून बीड जिल्ह्यातील केज आणि या केज तालुक्यातील तांबवा या गावचे रहिवासी असणारे ज्येष्ठ कलावंत शाहीर तुकाराम ठोंबरे यांच्या तांबेश्वर कलापथकास हा पुरस्कार देण्यात आला.प्रयोगात्मक कलाक्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदाना साठी त्यांच्या तांबेश्वर शाहीर कलापथक या संस्थेला हा सन्मान प्रदान केला.

शाहीर तुकाराम ठोंबरे यांचा जन्म एक जून १९५४ साली तांबवा ता.केज जि. बीड येथे झाला त्यांचे शिक्षण इयत्ता नववी पर्यंत झाले मात्र १९७१ सालचा भीषण दुष्काळामुळे त्यांना शाळा सोडून उदरनिर्वाहसाठी काम करावे लागले.वडील भजनी मंडळात गायन वादन करायचे संगीताचे संस्कार लहानपणा पासूनच त्यांच्या मनावर रुजले या संस्कारातून पुढे शाहिरीची आवड विकसित झाली वयाच्या पंधराव्या वर्षी शिवजयंती निमित्त मौजे लहुरी येथे त्यांनी पहिला पोवाड्याचा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर शिवजयंती, गणेशोत्सव,दुर्गाउत्सव, यात्रा आदी प्रसंगी त्यांचे सातत्याने कार्यक्रम सुरू होऊ लागले.

१९७१ साली केज येथे शाहीर सम्राट बापूराव विभूते यांचा कार्यक्रम पाहून त्यांना योग्य मार्गदर्शन लाभले आणि तेथूनच त्यांचा शाहिरीला सुरुवात झाली १९८५-८६ पासून शाहीर तुकाराम ठोंबरे हे भारत सरकारच्या गीत नाटक प्रभागाचे मान्यता प्राप्त कलावंत आहेत.त्यांनी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश गुजरात गोवा व कर्नाटक येथेही पोवाड्याचे कार्यक्रम सादर केले आहेत.

ऐतिहासिक पोवाडा बरोबरच व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा निर्मूलन,लोकशिक्षण, लेक वाचवा लेक शिकवा, वनीकरण,स्वच्छता अशा सामाजिक विषयावर त्यांनी शेकडो प्रबोधनात्मक कार्यक्रम केले.त्यांनी ३ पोवाडे आणि २५ लोक प्रबोधनात्मक गीतांचे लेखनही केले आहे प्रयोगात्मक कलाक्षेत्रा तील संस्था या प्रभागात २०२४ सालचा महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार त्यांच्या तांबेश्वर शाहिरी कलापत कला जाहीर झाला.मराठवाड्यातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या या ज्येष्ठ शाहिरांच्या कार्याची शासनाने घेतलेली दखल ही संपूर्ण लोककला विश्वा साठी प्रेरणादायी ठरत आहे.त्यांच्यावर सर्व क्षेत्रातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!