सावरगाव घाट येथे ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे आयोजन समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – चंदुलाल मिसाळ

केज/प्रतिनिधी
बीड तालुक्यातील सावरगाव घाट येथे येत्या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर “आपला दसरा,आपली परंपरा” या घोषवाक्याखाली ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शक्ती व भक्तीचासंगम असलेला हा मेळावा केवळ धार्मिक वा सांस्कृतिक नसून सामाजिक न्यायाची बाजू मांडणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.
मेळाव्याची माहिती देताना चंदूलाल मिसाळ यांनी सांगितले की, दसरा मेळावा हा कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून समाजा तील उपेक्षित,शोषित, वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठीची लढाई अधिक मजबूत करण्या साठीचे व्यासपीठ आहे. त्यामुळे हा मेळावा केवळ मेळावा न राहता एक सामाजिकचळवळ बनला आहे.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हजारो भाविक,कार्यकर्ते, समाज बांधव या मेळाव्यासाठी सावरगाव घाट येथे एकत्र येणार आहेत. धार्मिक विधी, संतविचार व सामाजिक प्रश्नांवर मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांमुळे हा मेळावा विशेष ठरणार आहे. चंदूलाल मिसाळ यांनी पुढे आवाहन केले की, केज तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक मेळाव्यास उपस्थित राहून समाजा तील वंचित व दुर्लक्षित घटकांच्या न्याय हक्का साठीच्या या लढ्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
या मेळाव्याला लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने होणारा हा मेळावा समाजभान,प्रेरणा व एकजुटीचा नवा इतिहास घडवेल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



