अध्यात्मिकधार्मिक

श्री विठ्ठल बिरुदेवाच्या नावाने चांगभलं च्या जय घोषात बोरगाव बुद्रुक येथे चैत्र पौर्णिमा यात्रा उत्साहात साजरी

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील श्री क्षेत्र बोरगाव बुद्रुक येथे चैत्र पौर्णिमा निमित्ताने उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल बिरुदेवाची यात्रा दि.२ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात रोकडुबा देवाच्या समाधीस्थळी संपन्न झाली.अठरा पगड जाती आणि बाराबलुतेदार आपापल्या लोकदैवतांच्या व कुल दैवतांच्या नावे मनोभावे पूजाअर्चा करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. वर्षानुवर्षे या लोकपरंपरे तून व यात्रा उत्सवातून सर्वगुण संपन्नतेतून नटलेल्या सांस्कृतिक वैभवाचे जतन व सामाजिक दर्शन या उपक्रमातून दाखवून दिले जाते.

जातीय व्यवस्थेशी सलग्न पारंपरिक ओव्या, नृत्ये,ढोल ताशांच्या गजरात निघालेली ही यात्रा म्हणजेच आपले सांस्कृतिक वैभव आहे याच परंपरेचा भाग म्हणून काढली जाणारी परज हि धनगर समाज बांधवांची खरी व अस्सल ओळख आहे.मौजे बोरगांव बुद्रुक येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त आयोजित यात्रा उत्सवात श्री विठ्ठल बिरूदेवाची मानाची परज श्री.बिरुदेव कस्पटे या देवाने तर मानाची येत सौरभ घोडके यांनी घेतली.

श्री विठ्ठल बिरुदेव ढोलकरी मंडळ नायगांव यांच्या कडुन श्याम घोडके,विकास घोडके, म्हाळाप्पा होदाडे,बिरू होदाडे,बिरू कस्पटे, कशिलिंग हिंगले,दादा होदाडे,सुरेश अण्णा, अमोल होदाडे,बिरुदेव भूतकर व सीताराम निंगुळे यांनी ढोलाच्या गजरात अवघा परिसर दुमदुमून टाकला.ही यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्या करिता खंडोबा देवाचे पुजारी गोपाळ देव निंगुळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

तसेच श्री.सोमनाथ निंगुळे,श्री. नवनाथ अप्पा गाते,श्री. लक्ष्मण होळकर, सोमनाथ ढोरमारे, बिरुदेव भूतकर यांच्या आशीर्वादाने व बाळकृष्ण निंगुळे,पवन बोराडे,गणेश गुरव, निखिल मुसळे,श्री.विष्णु निंगुळे,सीताराम निंगुळे यांनी कार्यक्रमाची धुरा यशस्वीरित्या पार पाडली श्री.तुकाराम बापू फाटक यांनी महाप्रसादाची धुरा सांभाळली.

दीपक होळकर व ॲड.उत्तरेश्र्वर निंगुळे यांनी या यात्रा सोहळ्याची रूपरेषा आखून रोकडुबा देवाचे वंशज नातू श्री.समाधान गाते यांच्या शिस्तबद्ध नियोजनाने सदरील यात्रा भंडारा उत्सव समाजाला कसलाही प्रकारचा आर्थिक स्वरूपात भार न पडता उत्साहात संपन्न झाला.बोरगाव बुद्रुक येथील विठ्ठल बिरुदेव यात्रा पंचक्रोशीतील भाविक भक्तांसाठी आनंददायी अनुभव देणारी ठरली अशी प्रतिक्रिया भाविक भक्तांनी व्यक्त केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!