प्रशासकीयसामाजिक

तहसीलदारांचे आवाहन अन व्यापारी महासंघाचा प्रतिसाद, हातावर पोट असणाऱ्या मजुरांसाठी दिला पंचावन्न हजार रुपयांचा मदत निधी 

केज/प्रतिनिधी

अतिवृष्टी झाली अन हातावर पोट असणाऱ्या स्थलांतरित मजुरांचे हाल सुरु झाले हाताला काम नाही मग पोट भरणार कसे अशावेळी नशिबी फक्त उपासमार सुरु झाली त्यांची ही अवस्था तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या कानावर आली अन त्यांनी केलेल्या मदती च्या आवाहनाला केज व्यापारी महासंघाने तात्काळ प्रतिसाद देत अवघ्या अर्धा तासात पंचावन्न हजारांची मदत तातडीने तहसीलदार राकेश गिड्डे यांच्याकडे सुपूर्द केली.

केज तालुक्यात मागच्या पंधरा दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेच आहे पिके पाण्यात गेली अन होत्याचे नव्हते झाले मात्र या अतिवृष्टीचे आणखीनही बरेच साईड इफेक्ट असून ते आता दिवसेंदिवस समोर येऊ लागले आहेत सोयाबीन काढणीचे दिवस असल्याने तालुक्यात सोयाबीन काढणीसाठी स्थलांतरित मजुरांच्या अनेक टोळ्या मागच्या काही दिवसापूर्वी दाखल झाल्या पण सततच्या पावसामुळे काम तर सोडा त्यांच्या राहण्याचेही वांदे सुरु झाले आतापर्यंत सोबत असलेले धान्य खाऊन पोटाची खळगी भरली पण पुढे कामच नाही मग पोट भरायच कसे ? हा प्रश्न मागच्या तीन चार दिवसांपासून सुरु झाला पण इथ आपल कुणी नाही मग अडचण सांगायची कुणाला हा ही प्रश्न होताच त्यांची ही अडचण केजचे कर्तव्यदक्ष तहसीलदार राकेश गिड्डे यांच्याकडे काहींनी सांगितली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदारांनी केज तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी यांच्या कडे सदरील बाब सांगितली व काही मदत करता येईल का ॽ असा प्रश्न केला सूर्यवंशी यांनी वेळ वाया न घालवता तात्काळ व्यापारी महासंघाच्या व्हाट्सअप ग्रुपवर मदतीची पोस्ट केली अन बघता बघता अर्धा तासातच पंचावन्न हजार दोनशे रुपयांची रक्कम जमली. जमलेली रक्कम घेऊन व्यापारी बांधव यांनी तहसील कार्यालयात जात तहसीलदार गिड्डे यांची भेट घेऊन त्यांच्या कडे जमा झालेली रक्कम सुपूर्द केली त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी बांधवानी निधी जमवून दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!