शैक्षणिक

श्याम विद्यालय दहिफळ वडमाऊली येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

केज/प्रतिनिधी,

केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील शाम विद्यालय, श्याम कनिष्ठ महा विद्यालय व श्याम गदळे कला विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात प्राचार्या सौ.जयश्री शरद गदळे यांच्या नेतृत्वाखाली हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला.याविषयी सविस्तर माहिती अशी की,शाळा हे समाजाचे एक प्रतिबिंब आहे समाज आणि शाळा यांचा सह संबंध आहे शाळेचे आणि समाजाच्या संबंधाचे, ऋणानुबंधाचे दृढीकरण व्हावे,वृद्धीकरण व्हावे, माता पालकांची जवळून चौकशी करता यावी आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे,रूढीचे व चालीरीतीचे संवर्धन व्हावे जतन व्हावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून प्राचार्या सौ.गदळे मॅडम यांनी सदरील कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी अनेक महिलांनी गीतगायन,अभंग,गवळणी गायन केले आणि कार्यक्रमात रस उत्पत्ती केली.यावेळी परिसरातील महिला भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती सुनंदा कुलकर्णी, श्रीमती इंदुमती ठोंबरे, श्रीमती मनीषा कदम व श्रीमती धनश्री मेहत्रे सह शाम विद्यालय शाम कनिष्ठ महाविद्यालय व श्याम गदळे कला विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अशी माहिती प्रसार माध्यमांना मा.सरपंच तात्यासाहेब डोईफोडे सर यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!