अपघातसामाजिक

टायर फुटल्याने बसला आग ; शिवसैनिकांनी प्रवाशांचे प्राण वाचवले

केज/प्रतिनिधी

केज–मांजरसुंभा रोड वरील सारणी येथे एका खाजगी बसचा टायर अचानक फुटल्याने बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.मात्र प्रसंगावधान राखत शिवसेनेचे दत्ताभाऊ काकडे व शहरप्रमुख आकाश अप्पा चाळक यांनी तत्परता दाखवत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून मोठा अनर्थ टळला.

घटनेनंतर अवघ्या पाच मिनिटांत दत्ताभाऊ काकडे व आकाश अप्पा चाळक घटनास्थळी पोहोचले.बसमध्ये आग लागलेली असतानाही जीवाची पर्वा न करता त्यांनी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले.सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्या नंतर त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले.या घटनेदरम्यान आंबेजोगाई येथील दोन अज्ञात तरुणांनीही मदतीसाठी धाव घेतली.

त्यांच्या सहकार्यामुळे बचावकार्य अधिक जलद गतीने पार पडले. याबाबत बोलताना दत्ता भाऊ काकडे म्हणाले की,“त्या क्षणी रील बनवण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवणे आमच्या साठी महत्त्वाचे होते. आम्ही शिवसैनिक म्हणून कर्तव्य समजून काम केले.” धोकादायक परिस्थितीतही धाडसाने प्रवाशांचे प्राण वाचवल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान,सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर काढल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.या धाडसी कार्या बद्दल दत्ताभाऊ काकडे व आकाश अप्पा चाळक यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!