
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यात सतत च्या मुसळधार पावसाने सोयाबीन पिकांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नदी काठ च्या गावातील जमिनी पूर्णपणे पिकांसह खरडून गेल्या आहेत. त्यामुळे शासनाने केज तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जेष्ठ नेते रमेश आडसकर यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
केज तालुक्यात मागील काही दिवसां पासून सतत मुसळधार पाऊस पडत असून नदी,नाल्यांना पूर येत आहे.शेतात पावसाचे पाणी साचले असून नदीच्या पुराचे पाणी नदी काठच्या गावात आणि शेतात शिरले आहे.त्यामुळे नदीकाठ च्या जमिनी पिकांसह खरडून वाहून गेल्या आहेत.घरांचे नुकसान झाले असून जनावरे ही वाहून गेले आहेत. त्यामुळे पशुधनाची जीवीत हानी झाली आहे.
काढणीला आलेले सोयबीन पीक पाणी साचल्याने जाग्यावर सडले असून पूर्णपणे हे पीक हातातून गेले आहे तर कापुस पिकांचे बोंडे, पाते गळून पडली असून कांदा जाग्यावर सडला आहे.त्याच बरोबर बाजरी,उडीद, मुग ही पिके हीहातातून गेले असून ऊस पिकांच्या सऱ्यामध्ये पाणी साचले असून मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सध्याच्या परिस्थितीत पाऊस थांबण्याचे नाव घेत नसून नद्या पाण्याने भरल्याने आता पात्र सोडून वाहत आहेत.
तालुक्यातील प्रत्येक गाव अतिवृष्टीने बाधित झाले असून शासनाने कुठल्याही प्रकारचे पंचनामे न करता तात्काळ सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची अर्थिक मदत देण्यात यावी. तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून ओल्या दुष्काळातील सर्व प्रकारच्या मदती शेतकऱ्यांना देण्यात याव्यात. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जेष्ठ नेते रमेश आडसकर यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी बाजार समितीचे सभापती अंकुश इंगळे,माजी उपसभापती ऋषीकेश आडसकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर पाटील,शहराध्यक्ष अजहर इनामदारयांच्या सह तालुक्यातील माजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य,सरपंच,उप सरपंच,सदस्य,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन,पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते.



