अध्यात्मिकसामाजिक

तुकूचीवाडी येथे खंडोबा मंदिर उभारणीचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

केज/प्रतिनिधी

दि.३० मार्च २०२६ सोमवार रोजी केज तालुक्यातील तुकुचीवाडी येथे खंडोबा देवस्थानच्या मंदिराचे भूमिपूजन या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकांत भैया मुंडे यांच्या शुभहस्ते व ह.भ.प.श्री.अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांन समवेत करण्यात आले.

गावकऱ्यांनी लोक सहभागातून खंडोबा देवस्थान मंदिर उभारण्याचा पुढाकार घेतला असून तुकूचीवाडी गावात भव्य दिव्य असे मंदिर होणार असल्याने गावाच्या वैभवात भर पडणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाल्याचे दिसून आले.या वेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!