सामाजिक

अखेर सर्वसामान्य जनतेच्या मनातील खदखद खा.बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून बाहेर,राष्ट्र हिताच्या बातम्यांकडे दुर्लक्ष म्हणत खा. बजरंग सोनवणेंनी वेधले सभागृहाचे लक्ष राज्यमंत्री डॉ.मुरूगन यांच्याकडून टीआरपी प्रणाली मधे बदल करण्यास मान्यता

केज/प्रतिनिधी

सध्या दूरदर्शन वरील वृत्त वाहिन्यांवरील बातम्यांचे मूल्यांकन ‘टीआरपी’ (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स)च्या आधारे होत असल्या मुळे उच्च-टीआरपी मिळविणाऱ्याबातम्यांना प्राधान्य दिले जाते,तर राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या परंतु कमी टीआरपी मिळविणाऱ्या बातम्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब खा. बजरंग मनोहर सोनवणे यांनी लोकसभेत उपस्थित केली.या प्रश्नाला उत्तर देताना माहिती व प्रसारण तसेच संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी सरकार टीआरपी मूल्यांकन प्रणालीत बदल करण्याची गरज मान्य करत असल्याचे स्पष्ट केले.

https://youtube.com/watch?v=Xxr9OVFHqPs&feature=shared

खा.बजरंग सोनवणे यांनी लोकसभेत अनेक विषयावर महत्वाची चर्चा केली असून अलिकडे अधिक टीआरपी मिळविण्या साठी किळसवाणे व्हीडीओज,विद्वेष पसरवणारे डिबेट्स, अनैतिक व सामाजिक विकृतीला खतपाणी घालणारे कार्यक्रम दाखविले जात आहेत. त्यामुळे निकोप समाज निर्मितीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. राजव्यवस्था,धर्म व्यवस्था, समाजव्यवस्था, कुटुंब व्यवस्था आणि व्यक्तिमत्व विकास यावर प्रसारमाध्यमांचा स्लो पोईजनिंगसारखा परिणाम होत असतो, असा मुद्दा मांडला. यावर उत्तर देताना डॉ.मुरुगन म्हणाले, नोंदणीकृत प्रेक्षक रेटिंग एजन्सीज कडून मिळणाऱ्या डेटावर आधारित असलेली विद्यमान प्रणाली सुधारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मंत्रालयाने टीआरपी मोजणी संदर्भातील विद्यमान धोरण मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्याचा मसुदा संकेतस्थळावर सार्वजनिक चर्चेसाठी प्रसिद्ध केला आहे.

सरकारच्या मते या सुधारणा केल्यामुळे न्याय्यस्पर्धेला प्रोत्साहन मिळेल,अधिक अचूक व प्रतिनिधिक डेटा निर्माण होईल,देशभरा तील प्रेक्षकांच्या विविध व बदलत्या माध्यम वापराच्या सवयींचे योग्य प्रतिबिंब दिसेल. त्यामुळे टीआरपी मूल्यांकनात गुणात्मक ते लाही महत्त्व दिले जाईल आणि अनैतिक स्पर्धेला आळा बसण्याची अपेक्षा आहे. खा.बजरंग सोनवणे यांनी सामाजिक विकृतीला खतपाणी घालणारे कार्यक्रम दाखवू नयेत,अशीही मागणी केली.

विकासात्मक विषया सोबतच सामाजिक स्वास्थ बिघडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या विषयावर खा.सोनवणे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच खा. बजरंग सोनवणे यांनी उल्लू टीव्ही या चॅनल वरील विकृत कार्यक्रमांचे प्रसारण बंद करण्यात महत्वाची भूमिका निभावलीहोती. यानंतर राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी सरकार टीआरपी मूल्यांकन प्रणालीत बदल करण्याची गरज मान्य करत असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान सर्व सामान्य नागरिकांच्या मनात असलेली ही खदखद खा.बजरंग सोनवणे यांनी संसदेत मांडल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.केंद्र सरकारने तातडीने पावले उचलुन अशा वाहिन्यांना पायबंद घातला पाहिजे अशी मागणी होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!