बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत स्वतंत्र समावेश करावा मागणीसाठी गोर सेनेचे केज तहसीलदारांना निवेदन

केज/प्रतिनिधी
महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती यादीत समाविष्ट करून स्वतंत्र आरक्षण टक्केवारी देण्याची मागणी गोर सेनेच्या वतीने मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,सेंट्रल प्रोविन्स बेरार,नागपूरच्या शिफारसी आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्याची अधिसूचना राज्य शासनाने केंद्रा कडे स्पष्ट शिफारसीसह पाठवावी.तसेच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक,तत्कालीन शासनाचे निर्णय तसेच न्या.बापट आयोग व अन्य आयोगांनी दिलेल्या शिफारशी नुसार संविधानाच्या अनुच्छेद ३४२(२) प्रमाणे आरक्षण देण्यात यावे.मा.पंतप्रधानांच्या हस्ते झालेल्या नगारा लोकार्पण कार्यक्रमात ही शासनाने आश्वासने दिली होती. तरीही अद्याप या समाजाचा प्रश्न प्रलंबित आहे,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गोर सेनेच्या नेत्यांनी निदर्शनास आणले की, महाराष्ट्रातील बंजारा समाजाला इतर राज्यां प्रमाणे संविधानिक सवलती मिळालेल्या नाहीत.
परिणामी तांड्या वरील जीवनमान अत्यंत हलाखीचे असून पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक तांडे रिकामे होऊन शहरी भागाकडे स्थलांतर होत आहेत.या मागणीसाठी निवेदन देताना देवानंद राठोड गोर सेना तालुकाध्यक्ष बालाजी राठोड,आत्माराम राठोड,प्रकाश राठोड, सुंदर राठोड,उत्तम राठोड,नवनाथ राठोड, सचिन राठोड,महादेव राठोड,सुधाकर पवार, नितीन राठोड,कृष्णा पवार,राहुल राठोड, नागेश राठोड,मधुकर पवार,अंकुश राठोड, सुनील राठोड,विकास राठोड आदींचा सहभाग होता.



