क्रांतीनगर कानडी रोड वरील पाणीपुरवठा लाईनचे खड्डे ठरले मृत्यूचा सापळा,एक तरुण गंभीर जखमी यश कन्स्ट्रक्शनचा गलथानपणा

केज/प्रतिनिधी
क्रांतीनगर,कानडी रोड येथे सुमारे आठ महिन्या पूर्वी सिमेंट रस्ता पूर्ण झाला असला तरी पाणी पुरवठा पाईप लाईनचे काम अद्याप झालेले नाही.यश कंन्स्ट्रक्शन कंपनीने पाईप टाकण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस खड्डे खोदले होते.मात्र हे खड्डे मुरूम न भरता तसेच उघडेच सोडलेले आहेत.

यश कन्स्ट्रक्शन च्या गलथानपणामुळे परिसरातील नागरिकांना सातत्याने अपघातांना सामोरे जावे लागत आहे.नुकत्याच झालेल्या अपघातामुळे रात्री दहाच्या सुमारास परिसरातील लाईट गेल्या मुळे रस्त्यावर मोठा अपघात झाला. या अपघातात आकाश नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाटउसळली असून,यश कंन्स्ट्रक्शन च्या गुत्तेदाराचा निष्काळजीपणा व प्रशासनाची उदासीनता यामुळेच अपघात घडत आहेत अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.याबाबत नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की, तात्काळ खड्डे बुजवून रस्त्याचे काम पूर्ण करावे,अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा परिसरा तील नागरिकांनी दिला आहे.



