श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भव्यधार्मिक उत्सवाचे आयोजन

केज/प्रतिनिधी
केज येथील श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) निमित्ताने श्रीस्वामी समर्थ महाराज प्रकटदिन उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.हा उत्सव दि.१९ मार्च २०२६ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.
उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी मूर्ती प्रतिष्ठापना,पाद्य पूजन,लघुरुद्राभिषेक व अलंकार पूजेनं होणार आहे.त्यानंतर श्री स्वामी समर्थ जन्मोत्सवानिमित्त कीर्तन,प्रवचन तसेच भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दि.२० मार्च रोजी सकाळी ते सायंकाळ पर्यंत विविध धार्मिक विधी व कीर्तन सेवा पार पडणार असून रात्री हरिकीर्तनाचा कार्यक्रम होईल.दि.२१ मार्च रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.२२ मार्च रोजी सकाळी पूजा अर्चा, कीर्तन व संध्याकाळी पालखी सोहळ्याने उत्सवाची सांगता होणार आहे.या धार्मिक सोहळ्यात विविध कीर्तनकार व प्रवचनकार आपली सेवा देणार आहेत.या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



