सामाजिक

कानेश्वर विद्यालयाचे सहशिक्षक नरहरी काकडे हे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील साबला या गावचे रहिवासी तसेच कानेश्वर विद्यालय कानडीमाळी येथे क्रीडा सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रीमान नरहरी शहाजी काकडे यांना श्रीमान वैभव जगदेवी विवेक स्वामी संपादक,समर्थ राजयोग यांच्या नियोजनाने आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक नितिन कोटेचा तसेच प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहेमान,माजी आमदार उषाताई दराडे,जेष्ठनेत्या सुशीलाताई मोराळे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,दैनिक लोकप्रभा संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ बीड जिल्हाध्यक्ष संतोषराव मानुरकर,सारडा सेठ, धुत सेठ इत्यादी मान्यवरांच्याउपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले, भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

तसेच श्रीमान नरहरी शहाजी काकडे यांचे कानेश्वर विद्यालय, कानडीमाळी तसेच त्यांच्या साबला या मुळ गावी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल स्वच्छता अभियान,वृक्षारोपण आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आरोग्य शिबीर, व्याख्यान कार्यक्रमांच्या आयोजनात सहभाग, साक्षरता अभियान,  ग्रामस्वच्छता अभियान यामध्ये उत्कृष्ट कार्य, सामाजिक, सांस्कृतिक ,क्रीडा,माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य इत्यादी बाबींचा विचार करून श्रीमान नरहरी शहाजी काकडे यांना श्रीमान वैभव जगदेवी विवेक स्वामी संपादक समर्थ राजयोग यांच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 या पुरस्कारानेसन्मानित करण्यात आले.

यावेळी श्रीमान समीर काझी, संपादक बीड प्रहार, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ,पोपट काकडे,माजी ग्राम पंचायत सदस्य रामराजे शिंदे,अंकुशराव मुळे, राहुल सरवदे तसेच गणेश कटारे, महादेव काकडे,लखन राऊत, सुदर्शन काकडे,आकाश काकडे,वसंत नाईकनवरे,दादा परळकर,अनिल भोसले,हनुमंत परळकर शिवाजी नाईकनवरे, भरतराव काकडे, तानाजी आंडिल,संजय सरवदे या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या वेळी साबला येथील सर्व मित्रपरिवार यावेळी उपस्थितीत होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!