प्रांजली चटप हिने राज्यस्तरीय वूशु स्पर्धेत मारली बाजी,कांस्यपदक पटकावत केजचा नावलौकिक वाढविला

केज/प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय वूशु स्पर्धेत केज येथील प्रांजली रमेश चटप हिने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे. ही स्पर्धा १९ वर्षांखालील वयोगटात व ६० किलो वजन गटात झाली होती.
प्रांजली च्या या घवघवीत यशामुळे केज शहरासह पंचक्रोशीतील नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे. ती सध्या शालेय शिक्षण घेत असून वूशु क्रीडा प्रकारात सातत्याने मेहनत घेत आहे.तिच्या या यशामागे प्रशिक्षक श्री. बद्रीनाथ तळेकर सर व महिला मुख्य प्रशिक्षिका पूजा तळेकर (शेरे) मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्रांजलीच्या मेहनतीला आणि कौशल्याला मिळालेले हे यश केवळ तिचेच नव्हे तर केज तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरत आहे. तिच्या या यशाबद्दल शाळा,कुटुंबीय,शिक्षक वृंद तसेच स्थानिक नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
आगामी काळात प्रांजली अजून मोठ्या स्तरावर यश मिळवेल,असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल व वूशु सारख्या लढाऊ खेळात अधिक विद्यार्थी सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



