सामाजिक

एलपीजी गॅस वितरक अशोक सौदागर यांचे दुर्दैवी निधन केज शहरात शोककळा,कोल्हापूर परिसरातील यात्रेदरम्यान पाण्याच्या भोवऱ्यात अडकून मृत्यू

केज/प्रतिनिधी

केज शहरातील सर्वांचे परिचित व प्रिय अशोक सौदागर यांचे कोल्हापूर परिसरात यात्रेच्या निमित्ताने गेल्याने दुर्दैवी निधन झाले.ही घटना दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.ते कुंडात पोहत असताना अचानक पाण्याच्या भोवऱ्यात अडकले आणि त्यातून बाहेर पडण्यात अपयश आल्याने त्यांचा मृत्यू झाला,अशी माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळाली आहे.

अशोक सौदागर हे गेल्या अनेक वर्षांपासून केज शहरात घराघरांत गॅस सिलेंडर पोहोचवण्याचे काम करत होते.त्यांच्या नम्र स्वभावा मुळे, वेळेवर सेवा देण्याच्या वृत्तीमुळे आणि सर्वसामान्यांशी साधेपणाने वागण्यामुळे ते प्रत्येकाच्या घराचा सदस्यच बनले होते.

गॅस संपल्यानंतर अशोक भाऊंना फोन करा हेच एकमेव उत्तर अनेक घरांतून ऐकायला मिळत असे.त्यांच्या निधनाची बातमी केजमध्ये वाऱ्या सारखी पसरली आणि शहरात शोककळा पसरली.अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यांच्या शेवटच्या दर्शना साठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. क्रांतीनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशोक सौदागर यांच्या पश्चात पत्नी,मुलं, नातवंडं असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने केजने एक सुस्वभावी, मनमिळावू आणि कष्टाळू व्यक्ती गमावली आहे. त्यांच्या कार्याची आणि सेवाभावी वृत्तीची आठवण केजवासीयांच्या मनात सदैव जिवंत राहील. केजवासीयां तर्फे अशोक सौदागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!