सामाजिक
वकर्तुंड गणेश मंडळा च्या वतीने अनाथाश्रम मधील व्यक्तीना अन्नदान, महादेव कराड यांनी व्यक्त केले आभार

केज/प्रतिनिधी
वकर्तुंड गणेश मंडळ प्रशांत नगर केज च्या वतीने केज शहरात असणाऱ्या स्वामी समर्थ अनाथाश्रम मध्ये नाविलाजाने राहणाऱ्या व्यक्ती ना गौरी पूजना च्या निमित्ताने घरी बनणारे जेवण मिळावे या उद्देशाने गौरी पूजन च्या दिवशी घरच्या जेवणाची पंगत दिली.
गौरी पूजनाच्या दिवशी प्रत्येक घरी पुरणपोळी, कडी,आमटी,16 प्रकारच्या भाज्या,वरण तूप,भात आदी जेवण बनवल जाते पण अनाथाश्रम मध्ये राहणाऱ्यांना मिळेलच असे नाही म्हणून या वर्षी पहिल्यांदाच अनाथाश्रम मध्ये राहणाऱ्यांना पण घरचे जेवण मिळावे म्हणून वकर्तुंड गणेश मंडळा च्या वतीने घरगुती जेवण देण्यात आले. यावेळी अनाथाश्रमाचे संचालक महादेव कराड यांनी गणेश मंडळाचे आभार मानले तसेच यावेळी गणेश मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.



