अध्यात्मिकसामाजिक

दत्तसेवक गोकुळ उगले यांच्या माध्यमातून सासुरा येथे साकारत आहे भव्य दिव्य श्री दत्त मंदिर,अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळा. 

केज/प्रतिनिधी

तालुक्यातील सासुरा येथील दत्तसेवक गोकुळ रामराव उगले यांच्या सासुरा येथील शेतात साधुसंत,संन्यासी,विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत अक्षयतृतीये च्या शुभ मुहूर्तावर दि. १९-४-२६ रोजी सकाळी ९-३० वाजता श्री गुरुदत्त मंदिराच्या उभारणीचे भूमिपूजन तसेच सभागृहाचे लोकार्पण होणार आहे.सासुरा येथील गोकुळ उगले हे मागील अनेक वर्ष पोलीस खात्यात आपले कर्तव्य बजावत आहेत. ते व त्यांचा परिवार श्री दत्तात्रय महाराजांचे भक्त असून दत्तात्रय महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हे महान कार्य आपल्या हातून घडत आहे असे उद्गार त्यांनी काढले.

या मंदिर भूमिपूजनास आ.सौ. नमिताताई मुंदडा यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमास ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर,प्रमोद काका कुलकर्णी,ह.भ. प. श्रीहरी महाराज पवार, ह.भ.प.रतन महाराज सासुरेकर, ह.भ.प. दिलीप साठे महाराज, स्वामीप्रनाथ,ह.भ.प. श्रीराम महाराज विडेकर, ह.भ.प.गोपीनाथ महाराज शास्त्री,ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंडके, ह.भ.प.केशव महाराज शास्त्री घुले,ह.भ.प.विष्णु महाराज,ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली,ह.भ.प .तुकाराम महाराज आंधळे यांच्या सह अनेक संत,मान्यवर, उपस्थिती व आशीर्वाद देण्यासाठी राहणार आहेत.तरी सदरील कार्यक्रमास जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गोकुळ उगले व परिवार सासुरा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!