
केज/प्रतिनिधी
डिजिटल पत्रकारितेच्या नव्या युगाची सुरूवात करत एस जी वन या मराठी न्यूज डिजिटल या वृत्तमाध्यमाच्या प्रथम दिवाळी अंकाचे अनावरण केज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय आरकडे, पत्रकार प्रदिप गायकवाड, दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते दिलीप बनसोडे, तसेच एस जी वन मराठी न्यूज डिजिटलचे संपादक रंजीत घाडगे उपस्थित हे होते.कार्यक्रमाचे आयोजन केज शहरात उत्साहात पार पडले.या प्रसंगी डिजिटल माध्यमां च्या वाढत्या प्रभावावर आणि स्थानिक पातळीवर विश्वसनीय बातमीदार नेटवर्क निर्माण करण्याच्या गरजेवर वक्त्यांनी भर दिला.
प्रमुख पाहुणे रमेशराव आडसकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या काळात डिजिटल माध्यमे समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोहोचत आहेत.एस जी वन मराठी न्यूज डिजिटल सारखी स्थानिक मीडिया ग्रामीण भागातील वास्तव मांडण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ ठरेल असे ते म्हणाले.
संपादक रंजीत घाडगे यांनीही सर्व उपस्थितांचे आभार मानत सांगितले की,या प्रसार माध्यमाचा उद्देश सत्य, पारदर्शक आणि समाज हिताचे पत्रकारितेचे भान ठेवून बातम्या सादर करणे हा आहे.कार्यक्रमाचे सूत्र संचालन पत्रकार प्रदीप गायकवाड यांनी केले,तर आभार प्रदर्शन विजय आरकडे यांनी मानले. या प्रसंगी विविध सामाजिक, पत्रकार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



