शेतकरीपुत्र खा.बजरंग सोनवणे भरपावसात शेतकऱ्यांच्या बांधावर ; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
केज तालुक्यात मांजरा नदीच्या पाण्याने ओलांडले पात्र,शेती, पिकांसह घरांचेही अतोनात नुकसान

बीड/प्रतिनिधी
सलग दोन दिवस धो-धो पाऊस पडल्याने केज तालुक्यात मांजरा नदीतील पाण्याने पात्र सोडले.संपूर्ण मांजरा काठ आणि जवळपास सात गावातील नदी पात्रा शेजारील शेतात पाणी शिरले. उभे पिक वाहून गेलेच पण शेती ही खरडून गेली. डोळ्यादेखत होत्याचे नव्हते झाले.अनेकांच्या राहत्या घराचीही पडझड झाली.यावेळी ज्यांच्या त्यांच्या डोळ्यात पाणी उतरले. दुपारी १२ वाजता खा.सोनवणे यांना या गावांमधून फोन आले. यानंतर सोनवणे यांनी नियोजीत दौरा रद्द करून तातडीने क्षतीग्रस्त गावे गाठली. यावेळी पाऊस सुरूच होता.पडत्या पावसात खा.बजरंग सोनवणे शेतात पोहचले. नुकसानीची पाहणी केली.शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असा शब्दही शेतकऱ्यांना दिला.
बीड जिल्ह्यात काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे.दि. १५ ऑगस्ट रोजी पहाटे बीडतालुक्यातील पाली, नाळवंडी,चौसाळा, नेकनूर,लिंबागणेश, पाटोदा तालुक्यात पाटोदा,थेरला,गेवराई तालुक्यात धोंडराई, रेवकी, तलवाडा, केज तालुक्यात संपूर्ण मांजरा काठ व युसूफ वडगाव, बनसारोळा, नांदूरघाट,परळी तालुक्यात नागापूर, सिरसाळा, शिरूर तालुक्यातील तिंतरवणी,ब्रम्हनाथ, येळंब या महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे.याच बरोबर दि.१६ ऑगस्ट च्या पहाटे ही पावसाने हजेरी लावली असून इतर अनेक ठिकाणी सुद्धा पिके पाण्यात आहेत.
तर काही ठिकाणी नदीचे पात्र ओलांडून पाणी शेतात शिरले आहेत.केज तालुक्यातील मांजरा नदी दुथडी भरून वाहत असून राजेगाव,दैठणा, बोरगाव,भोपला,हदगाव,डोका व लाखा या सात गावासह संपूर्ण मांजरा पट्ट्यातील गावे क्षती ग्रस्त झालेली आहेत. उभ्या पिकांचे नुकसान झाले आहेच पण जमीनीही खरडून गेल्या आहेत.अनेक वस्त्यांमधे पाणी आले असून घरांची पडझड झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी खा.बजरंग सोनवणे यांना दिली. दरम्यान,खा.बजरंग सोनवणे यांनी दिवस भरातील विविध कार्यक्रमांचे दौरे रद्द करत तातडीनेक्षतीग्रस्त गावात जावून भेट देण्याचा निर्णय घेतला. राजेगाव येथे ते पोहचले तेव्हा पाऊस सुरूच होता.पडत्या पावसात खा.बजरंग सोनवणे हे शेतातील पाण्यात उतरले.यावेळी पाण्यातील पिकांची काय अवस्था झाली आहे,हे स्वत: पाहिले.
संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसण्याचे ही काम खा.सोनवणे यांनी केले.पुढे,दैठणा, बोरगाव,भोपला,लाखा या गावातील नदीपात्रा शेजारील शेतात जिथे पाणी शिरले आहे,अशा ठिकाणी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी धीर तर दिलाच पण तुमच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाला बोलत आहे.संकटाच्याकाळात शासनाने तात्काळ हस्तक्षेप करूनशेतकरी व नागरिकांना दिलासा द्यावा,अशी अपेक्षाही व्यक्त केली.मदत मिळवून देण्यासाठी आपल्याला शासन स्तरावर जे जे करावे लागेल,ते आपण करू, असा शब्दही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.



