विजचोरी प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर ; अॅड. सुनीता देशपांडे-जोशी यांच्या प्रयत्नांना यश

अंबाजोगाई/प्रतिनिधी
केज येथील एका व्यावसायिकावर दाखल करण्यात आलेल्या वीज चोरीच्या गुन्ह्यात अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला असून, या प्रकरणात आरोपीच्या वतीने प्रभावीपणे बाजू मांडणाऱ्या अॅड.सुनीता देशपांडे-जोशी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
या प्रकरणात आरोपीस अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अॅड.सुनीता देशपांडे – जोशी यांनी न्यायालयासमोर वस्तुनिष्ठ व कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती मा.डॉ.रचना नेहरा यांनी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या निर्णयामुळे संबंधित व्यावसायिकाला मोठा दिलासा मिळाला असून,अॅड.सुनीता देशपांडे -जोशी यांच्या कायदेशीर कौशल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे न्यायालयीन प्रक्रियेत योग्य न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.



