मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी चे थकित मानधन तात्काळ द्या – प्रा.बबनराव आंधळे

बीड/प्रतिनिधी
मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या बेरोजगार युवा प्रशिक्षणार्थीना त्यांच्या थकीत मानधनाच्या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यातील जानेवारी,फेब्रुवारी महिन्याचे मानधन एक वर्ष उलटूनही मिळालेले नाही.दुसऱ्या टप्प्यातील मानधन थकीत आहे त्यामुळे प्रशिक्षणार्थी मध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शिक्षणाधिकारी बीड यांना ग्रामीण युवक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे सुशिक्षित बेरोजगारीच्या श्रम आणि वेळेचा अपमान होत असल्याची भावना प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केली आहे. प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रमुख समस्या आणि मागण्या आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पहिल्या टप्प्यातील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे मानधन एक वर्ष उलटूनही मिळालेले नाही.
जुलै मध्ये ऑर्डर मिळूनही जुलै,ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही. नोव्हेंबर महिना सुरू झाला असून दसरा होऊन गेला आणि दिवाळी अंधारात गेली सणासुदीत मानधन न मिळाल्याने कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करताना प्रशिक्षणार्थींना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला या निवेदनात प्रशिक्षणार्थीने प्रशासनाच्या उदासीनते वर कठोर टीका केली आहे.बेरोजगार तरुणांना त्यांच्या मानधना साठी प्रशासनाच्या दारात यावे लागते ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
प्रशिक्षणार्थीने पुढील तीन स्पष्ट मागण्या केल्या आहेत जानेवारी, फेब्रुवारी या मागील थकीत महिन्याचे मानधन त्वरित अदा करावे जुलै ते ऑक्टोबर या महिन्याचे थकित मानधन येत्या आठ दिवसाच्या आत अदा करावे. भविष्यात प्रशिक्षणार्थीचे मानधन दर महिन्याच्या पाच तारखे पर्यंत नियमितपणे जमा होईल यासाठी ठोसयंत्रणा तयार करावी प्रशासनाने बेरोजगार तरुणांची कुचेष्टा थांबवावी अन्यथा ग्रामीण युवक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.



