सामाजिक

सज्जा आवसगाव चे ग्राम महसूल अधिकारी यांचा उत्कृष्ठ ग्राम महसुल अधिकारी म्हणून सन्मान

केज /प्रतिनिधी

दि.01.08.2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड च्या वतीने महसूल दिन गेवराई जिल्हा बीड येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला गेवराई विधानसभेचे आमदार श्री.विजयसिंह पंडित बीडचे जिल्हाधिकारी मा.विवेक जॉनसन बीड जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी श्री. जितीन रहमान जिल्ह्यातील सर्व अप्पर जिल्हाधिकारी, सर्व उपजिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या सह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या दिनी वर्षभरात उत्कृष्ठ काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात येतो. यात अंबाजोगाई उपविभागात तहसिल कार्यालय केज येथे कार्यरत असलेले शेतकऱ्यांप्रती स्नेहभाव व जिव्हाळा जपणारे ग्राम महसूल अधिकारी संजयकुमार तात्याराव शिंदे सन 2013 साली महसूल सेवत तलाठी पदावर तहसिल कार्यालय केज येथे रुजु झाले. आजपर्यंत तालुक्यातील अनेक सज्जा वर त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे.कायद्याचा चौकटीत राहून शेतकऱ्याच्या अडचणी सोडवणारा अवलिया अशा स्वरूपाचे त्यांचे काम राहिले आहे. शासनाचया योजना गतिमानतेने व पारदर्शीपणे, लोकांच्या पर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. लोकाभिमुख शासनाचा प्रतिनिधी म्हणून गाव पातळीवर त्यांचे काम उल्लेखनीय आहे. एकूणच त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना सन 2024-25 चा उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार देवून मा. जिल्हाधिकारी बीड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!