सामाजिक

जिल्हा परिषद उच्च प्राथमिकशाळा तरनळी शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लो.टिळक पुण्यतिथी साजरी.                                       

केज/प्रतिनिधी

दि.1ऑगस्ट 2025 शुक्रवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी केंद्र लव्हुरी ता.केज शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत्ती सुदाम सरवदे,उपाध्यक्षा सौ.सीमा सुधीर मोहिते, अपग्रेड मुख्याध्यापक श्री.राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळकयांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म दि.1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे मुळ नाव डॉ.तुकाराम भाऊराव साठे हे होते.आईचे नाव वालुबाई होते.तेअस्पृश्य समाजात जन्मलेले दलित होते.ते भारता तील समाजसुधारक, लोककवी,लेखक, कादंबरीकार,साहित्य रत्न,लोकशाहीर होते. त्यांनी बहुजनांच्या हितासाठी कार्य करून समाज जागृती केली. त्यांचा कार्याचा आदर्श घेण्यासारखे त्यांनी कार्य केले.लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात दि. 23 जुलै 1856 रोजी झाला.आईचे नाव पार्वतीबाई होते.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे नेते होते.

ते स्वातंत्र्यसेनानी,पत्रकार, समाजसुधारक होते. त्यांनी केसरी व मराठा हे वृत्तपत्र सुरु केले व समाज जागृती केली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच”ही त्यांची घोषणा होती.त्यांचा मृत्यू दि.1ऑगस्ट1920 रोजी झाला.असे आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिकशाळा तरनळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले. या शाळेतील शिक्षक श्री.बाळासाहेब भिल्लु राठोड सर,श्री. बाबासाहेब राजाराम मैंद सर,श्री.भारत बाबुराव हांगे सर, श्रीमती गिताताई जीवराज अंडील मॅडम, श्रीमती सोनाली भारतराव भुमकर मॅडम,ट्रेनी शिक्षिका सौ.सीमा सुधीर मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी या शाळेतील आदर्श शिक्षिका श्रीमती गिताताई जीवराज अंडील मॅडम यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त पुष्पहार, पुष्पगुच्छ,शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत्ती सुदाम सरवदे,उपाध्यक्षा सीमा सुधीर मोहिते, सदस्य,ज्येष्ठ नागरिक विठ्ठल तात्या माने,राधा आक्का खामकर,पीएम पोषण शक्ती निर्माण योजनाचे कामगार श्री. गणेश काशिनाथ माने हे उपस्थित होते.शेवटी श्री.बाबासाहेब राजाराम मैंद सर यांनी आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इ.7 वी वर्गातील विद्यार्थीनी श्वेता सुहास सरवदे यांनी केले.तिला सहकार्य अंकिता विनोद मोहिते,ज्योती श्रीराम खामकर, भाग्यश्री ओमप्रकाश मोहिते,नेहा सतीश माने,हर्षदा सतिश सानप यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!