स्वानंद सार्वजनिक वाचनालयात लोक शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लो.टिळक पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.

केज/ प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दि.१ऑगस्ट २०२५ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊसाठे जयंती व बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी साधेपणाने साजरी करण्यात आली
सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे व बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भैरु चौधरी,मेजर विठ्ठल सौदागर,रविंद्र गायकवाड पेंटर, सुखदेव गायकवाड, अरुण गायकवाड यांची उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, ख्यातनाम वक्ते व परखड व्याख्याते डॉ. वसुदेवबप्पा गायकवाड हे होते.प्रमुख पाहुणे भैरू चौधरी,रविंद्र गायकवाड पेन्टर,मेजर विठ्ठल सौदागर यांनी थोडक्यात मनोगतव्यक्त केले.अध्यक्षीय समारोपात डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी तील व साहित्य क्षेत्रातील योगदान वाखाणण्या योग्य असल्याचे सांगून सामाजिक व भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळी तील योगदान वाखाणण्या योग्य असल्याचे प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.
यावेळी बाळासाहेब गायकवाड,सुखदेव गायकवाड,अरुण गायकवाड,माजीसरपंच रामराजे गायकवाड, नारायण गायकवाड, रमेश गायकवाड,सुधीर गायकवाड,रामराव गायकवाड,अनन्या गायकवाड,आरती गायकवाड यांच्यासह वाचक,हितचिंतक यांची उपस्थिती होती.



