सामाजिक

पवनराजे इंग्लिश स्कूल मध्ये साहित्यरत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

केज/प्रतिनिधी

पवनराजे इंग्लिश स्कूल केज येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले.समाज परिवर्तनाचे प्रबळ साधन म्हणून कार्य करणाऱ्या साठे यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पवनराजे इंग्लिश स्कूल चे संस्थापक अध्यक्ष खंडेराव चौरे होते.त्यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य विद्यार्थ्यां समोर उलगडले.ते म्हणाले की,”साठे हे केवळ साहित्यिकनव्हते तर ते खऱ्या अर्थाने समाजासाठी लढणारे युगपुरुष होते.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित,गरीब,मजुरांच्या न्यायासाठी वाहिले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मुख्याध्यापक अशोक मस्के सर व घुले सर होते.अशोक मस्के सर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, आजच्या पिढीने साठे यांच्या जाज्वल्य संघर्षा तून प्रेरणा घेणे गरजेचे आहे.शिक्षण,मेहनत आणि सामाजिक भान हे त्यांच्या कार्याचे मूळ होते.घुले सर यांनी आपल्या मनोगतातून साठे यांच्या साहित्याची सामाजिक जाणीवेची खोली उलगडली.त्यांनी सांगितले की,‘फकिरा’, ‘बारखान्या’ या सारख्या कादंबऱ्यांतून साठे यांनी सामाजिक विषमता,अन्याय आणि दडपशाहीविरुद्ध संघर्ष उभा केला.कार्यक्रमात दळवे मॅडम यांनी देखील मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता समाजाच्या वास्तव समस्यांकडे सजग दृष्टीने पाहिले पाहिजे. साठे यांच्या जीवनातून ते शिकता येईल.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अजय भांगे सर यांनी केले. त्यांनी आपल्या शैलीत कार्यक्रमाला एक सुसंवादात्मक स्वरूप दिले.तर कार्यक्रमाच्या शेवटी अश्विनी मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे,शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.या कार्यक्रमास चौरे मॅडम, डि.एस.चौरे सर,पठाण सर,पारखे मॅडम,केदार मॅडम,जाधव मॅडम, टेकाळे मॅडम,मुळेमॅडम, प्राची मॅडम,संजना मॅडम,अक्षता मॅडम, प्रगती मॅडम,अमृता मॅडम,लक्ष्मी मॅडम, सानिया मॅडम,विशाल सर,राऊत सर,काळे सर,निखिल भांगे सर यांच्यासह शाळेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!