पोलिस प्रशासनास मनमोकळेपणाने आपले काम करू द्यावे – स्वप्नील उनवणे पोलिस निरीक्षक,केज

केज/प्रतिनिधी
केज येथून अमर राजाभाऊ देडे नामक व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर केज पोलिस स्टेशनला या संबंधीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दहा दिवस उलटून गेल्यामुळे मुलीचा व सबंधित व्यक्तीचा ठावठिकाणा मिळत नसल्यामुळे तपास कशा पद्धतीने सुरू आहे याची विचारपूस करण्यासाठी दि.३१ जुलै रोजी मुलीच्या नातेवाईकांनी केज पोलिस स्टेशनला मोठ्या संख्येने हजेरी लावली असता,पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे साहेबांनी आपल्या कर्मचाऱ्यांना काही निर्देश दिले. दररोज नियमित तपास करणे,उत्कृष्ट पद्धतीने तपास मार्गी लावणे, पीडितेच्या नातेवाईका बद्दल सहानुभूती असणे,फक्त रक्त नात्याच्या व्यक्तींनाच तपासाची नियमित माहिती देणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.त्याच प्रमाणे अशापरिस्थितीत इत्तर लोकांनी येऊन राजकीय भाषेत पोलिस कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस प्रशासनाला मुक्तपणे काम करण्यास अडथळे निर्माण होत असून अशा प्रकारचे अडथळे निर्माण होऊ नयेत याची सर्वांनी काळजी घ्यावी व सहकार्याच्या भावनेतून पोलिस प्रशासनास मनमोकळे पणाने आपले काम करू द्यावे असे आवाहन देखील केले आहे.



