सामाजिक

केज-कळंब रोडवर बस दुचाकी अपघातात एक ठार एक जखमी.

केज /प्रतिनिधी

शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर केज तालुक्यातील सुर्डीफाटा येथे बस दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना बुधवारी दि.30 जुलै रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.गणेश बंकट अंबिरकर असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी,गणेश बंकट अंबिरकर राहणार डिकसळ ता. कळंब वय 40 आणि अब्बास शेरखान पठाण वय 60 मूळ रहिवाशी लाखा ता.केज ह.मु. इस्लामपुरा कळंब हे दोघे कळंब येथून सुर्डी येथील एका कार्यक्रमा निमित्त दुचाकीवरून (MH 25 Z 34 63) निघाले होते.सुर्डी फाट्याजवळ आल्या नंतर सुर्डी कडे जाणाऱ्या रस्त्याकडे दुचाकी वळवली त्याच वेळी मागून पुणे येथुन वसमत (MH 20 BL 5850) कडे जाणारी एसटी बसचा दुचाकींला धक्का लागून दुचाकी वरील दोघे खाली पडले आणि बसचे मागील चाक गणेश अंबिरकर यांच्या डोक्यावरून गेले त्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.तर अब्बास शेरखान पठाण हे जखमी झाले आहेत.

दरम्यान अपघात होताच बस चालकाने बस युसुफवडगाव पोलीस ठाण्यात नेऊन लावली आणि अपघाताची माहिती दिली.युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे स.पो. नी.मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.शेंडगे संपत व कोकाटे महेश यांनी अपघात स्थळाचा पंचनामा केला.त्यानंतर ऍम्ब्युलन्सने गणेश अंबिरकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंब येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिला.पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!