
केज/प्रतिनिधी

चाईल्ड प्रायमरी स्कूल तर्फे विद्यार्थ्यांसाठी एक आगळीवेगळी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली.या सहलीत विद्यार्थ्यांना शहरात भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला नेण्यात आले.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आधुनिक शेतीतील यांत्रिकीकरण, नवनवीन शेती तंत्रज्ञान, आधुनिक सिंचन पद्धती, सेंद्रिय शेतीचे महत्त्व तसेच कृषी क्षेत्रात होत असलेल्या प्रगत बदलां विषयी प्रत्यक्ष माहिती मिळवली.प्रदर्शनात ट्रॅक्टर,हार्वेस्टर,ड्रोन तंत्रज्ञान, बियाणे प्रक्रिया यंत्रणा तसेच शेतकऱ्यां साठी उपलब्ध असलेली अत्याधुनिक साधने पाहून विद्यार्थ्यांनी डोळे विस्फारले त्यांनी शेतमालाच्या विविध उत्पादनांविषयी अनेक प्रश्न विचारले व मार्गदर्शकांकडून समाधानकारक उत्तरे मिळवली.
शेती ही आपल्या देशाची खरी ताकद आहे,हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून जाणवले.या सहलीमुळे त्यांच्या मनात कृषीविषयी आदरभाव निर्माण झाला तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा शेतीशी असलेला जवळचा संबंध त्यांनी समजून घेतला.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह झळकत होता.नवीन ज्ञानाचा खजिना मिळाल्याची भावना त्यांच्या प्रत्येक नजरेत दिसत होती.शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले की,अशा शैक्षणिक सहली विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धी सोबतच त्यांचा दृष्टिकोन विस्तृत करतात.शिक्षण केवळ वर्गात नाही,तर प्रत्यक्ष अनुभवातून अधिक प्रभावीपणे घडते.
एकूणच,ही कृषी प्रदर्शनाची शैक्षणिकसहल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि आनंददायी ठरली.सहलीच्या शेवटी विद्यार्थ्यांना स्वादिष्ट खाऊ देऊन आनंदात दिवसाचा समारोप करण्यात आला. विध्यार्थ्यांना मार्गदर्शन डॉ.हनुमंत सौदागर सर यांनी केले.यावेळी सर्व स्टाफ उपस्थित होता.



