सामाजिक

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करा – बबनराव आंधळे 

बीड /प्रतिनिधी

बीड जिल्ह्यामध्ये दि.२६ मे रोजी अवकाळी पावसामुळे गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामध्ये फळबागा,कांदा अशा अनेक फळांचे, जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.जनावरांच्या चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामध्ये गंज लावलेली असेल गंजी देखील उडून गेलेल्या आहेत. बीड जिल्ह्यामध्ये चिंचवडगाव या ठिकाणी घरावरचे सर्व पत्रे उडालेले आहेत घरातील सामानाचेही नुकसान झालेले आहे व या भागातील लाईटचे सर्व पोल पडलेले आहेत. कारण या अवकाळी पावसाचा केंद्रबिंदू चिंचवडगाव म्हटले तरी वावगे ठरणार नाही पूर्ण गावांमध्ये निसर्गाने तेथील कुटुंबावर घाला घातला आहे.चिंचाळा, नागरगोजे वस्ती,खापर वाडी,काडीवडगाव,देव गाव,हरिश्चंद्र पिंपरीतांडा, पिंपरीगाव,चिंचोटी, जोडआंबा, वलीपूर जवळा,मन्यारवाडी आंबेसावळी, घाटसावळी, ताडसोन्ना, केसापुरी परभणी, ढोरवाडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि तीव्र वादळामुळे शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीत केळीच्या बागा आणि उसाचे पीक भुई सपाट झाले असेल अनेक घरांची पडझड झाली आहे तसेच अनेक जनावरे दगावल्याची ही माहिती आहे .अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे या वादळात केज तालुक्यातील सोनी जवळा येथील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे या पार्श्वभूमीवर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी ग्रामीण युवक संघटनेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत केज तालुक्यातील शेतकरी आधीच संकटात आहे या अवकाळी पावसाने त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला जात आहे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे पाठवून शेतकऱ्यापर्यंत लवकरात लवकर भरघोस मदत पोहोचण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल तो करावा अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!