सामाजिक

मुख्यमंत्री समृध्दी पंचायत राज अभियान २०२५-२६ अंतर्गत केज तालुक्यातील कुंबेफळ ग्रामपंचायतची जिल्हा स्तरीय तपासणी

केज/प्रतिनिधी

मुख्यमंत्री समृध्दी पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय तपासणी समिती पंचायत समिती मंगळवेढा जि.सोलापुर च्या समितीने दि.११ मे २०२६ रोजी श्री. विजयकुमार देशमुख गटविकास अधिकारी पंचायत समिती मंगळवेढा,अशोक नलावडे विस्तार अधिकारी,ज्ञानेश्वर जतकर आरजीएस यांनी केज तालुक्यातील कुंबेफळ ग्रामपंचायतची तपासणी केली होती. त्यामध्ये कुंबेफळ ग्रामपंचायतला १ क्रमांक मिळाला.दि.२६ मे २०२६ रोजी जळगावचे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर साहेब,उपमुख्यकार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलडे साहेब यांनी जिल्हास्तरीय ग्राम पंचायत कुंबेफळ ता. केज ची तपासणी केली. यामध्ये आरोग्य विभाग, अंगणवाडी,कृषी,बचत गट,तलाठी कार्यालय, वाचनालय,शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेची पाहणी करून तपासणी केली.सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.सर्व अभिलेखे तपासले.

कुंबेफळ ग्रामपंचायतने राबविलेले विविध उपक्रमांची पाहणी केली. केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.श्री. नागरगोजे साहेब, शिक्षण विभागाचे बीड जिल्हा परिषदेचे मा.उप शिक्षणाधिकारी श्री.मयुर मोदानी साहेब,केजचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री.सुनिल केंद्रे साहेब, केज केंद्राचे मा.केंद्र प्रमुख संजय चौरे साहेब , कुंबेफळ ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच श्री.अविनाश पांचाळ, उपसरपंच सौ.श्रध्दा विष्णु थोरात,विष्णु आबा थोरात,ग्रामविकास अधिकारी श्रीमती रेवती भोसले मॅडम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.शालु विजय थोरात,डाटा ऑपरेटर संदीप उध्दव थोरात, मनोज थोरात,कुंबेफळ ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री.राजाभाऊ दत्तात्रय कदम,प्राथमिक पदवीधर शिक्षक डॉ.रामकिशन ग्यानबा मुळे सर,गणित विज्ञानचे प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री. संदीप मेघराज ठोंबरे सर, आदर्श शिक्षक श्री. आकाश दत्तु लोंढे सर, आदर्श शिक्षक श्री. आबासाहेब तुळशिराम धपाटे सर,राहुल बजरंग बचुटे सर,श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम,श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम,अंगणवाडी ताई,मदतनीस, पीएम पोषण शक्ती निर्माण योजना कामगार सौ. सुवर्णमाला पवार,सौ. अनिता पवार,विद्यार्थी उपस्थित होते.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज या शाळेची या समितीने सर्व सुविधांची पाहणी करून कसून तपासणी करून सखोल मार्गदर्शन केले व समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!