सामाजिक

नैसर्गिक वर्ग वाढ तुकडींना तात्काळ अनुदान देण्यात यावे -शेषराव चव्हाण

केज/प्रतिनिधी

वित्त विभागाच्या अधीन राहून नैसर्गिक वर्गवाढीने मान्यता प्राप्त संस्था चालकांची महत्त्वपूर्ण बैठक आज साने गुरुजी निवासी विद्यालय,केज, जि.बीड येथे संघटनेचे अध्यक्ष श्री.शेषेराव चव्हाण यांच्या अध्यक्षते खाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.कार्यक्रमाची प्रस्तावना संघटनेचे सचिव अॕड.श्री.उद्धव कराड सर यांनी केली.

सूत्रसंचालन डॉ.कविता कराड मॅडम यांनी केले तर स्वागतगीत साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका शेख मॅडम यांनी सादर केले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.या बैठकीस ज्येष्ठ संस्थाचालिका सौ. पुष्पाताई संभाजीराव पगारे मॅडम,ज्येष्ठ संस्था चालक श्री.मानवेंद्र केंद्रे, संघटनेचे उपाध्यक्ष श्री.राजेंद्र चव्हाण, श्री.शंकर राठोड, श्री.अनुरथ सानप, श्री.अनिल महाराज यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास १५० संस्था चालक उपस्थित होते. अनेक संस्थाचालकांनी काही कामानिमित्त येता आले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून संघटना जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे असे सांगितले.बैठकी मध्ये नैसर्गिक वर्गवाढीने मान्यता प्राप्त वर्गांना अनुदान मिळवून घेण्यासाठी पुढील रणनीती,शासनस्तरा वरील पाठपुरावा व संघटनात्मक बळकटीकरण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

उपस्थित सर्व संस्थाचालकांनी एकमुखाने संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच नैसर्गिक वर्गवाढीने मान्यता प्राप्त वर्गांना लवकरात लवकर अनुदान मिळवून घेण्यासाठी एकजुटीने राहण्याचा संकल्प केला. बैठकीत आश्रम शाळांच्या विविधसमस्या, शाळांच्या आर्थिक अडचणी तसेच शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.राज्यातील सर्व संस्थांनी संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.बैठकीचा समारोप सकारात्मक,उत्साह वर्धक व संघटनात्मक एकतेचा संदेश देणाऱ्या वातावरणात झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!