सामाजिक

राजमाता जिजाऊचे वंशज शिंदखेड राजा येथील श्री.शिवाजी राजे जाधव यांचा केज मध्ये सत्कार संपन्न  

केज/प्रतिनिधी

केज येथील शासकीय विश्रामगृह येथे सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांचे वंशज श्री. शिवाजी राजे जाधव यांनी धावती सदिच्छा भेट दिली असताना छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख श्री.शिवाजी दादा ठोंबरे व केज विकास संघर्ष समितीचे प्रमुख श्री.हनुमंत भोसले सर, बहुजन क्रांती मोर्चाचे श्री.बाबुराव गालफाडे सर,तसेच रोटरी क्लब ऑफ केजचे महेश जाजू, मराठा आरक्षण उपोषण कर्ते दिगंबर नाना तपसे, माजी सैनिक संघटनेचे सपाटे सर व पत्रकार पांडुरंग कसबे ईत्यादी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होतें.

यावेळी श्री.शिवाजीराजे जाधव राजमाता जिजाऊ यांचे वंशज असे म्हणाले की, दि.१५ जुन ते १७ जुन २०२६ रोजी राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित सिंदखेडराजा ते पाचड रायगड रॅली मध्ये बीड व केज येथील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.यावेळी मोठ्या संख्येने रॕलीमध्ये सहभागी होणार असल्याचे शिवाजी दादा ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!