सामाजिक

फलोत्पादन विभागाची जागा केज नगरपंचायत ला हस्तांतरित,केज वासियांसाठी आनंदाचा क्षण गटनेते डॉ. हारुणभाई इनामदार

केज/प्रतिनिधी

केज नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) गटनेते डॉ.हारुणभाई इनामदार यांनी मंगळवारी केज येथील शासकीय विश्रामगृहा वर पत्रकार परिषद आयोजित केली होती. सदरील पञकार परिषदेला गटनेते हारूणभाई इनामदार, नगराध्यक्ष डॉ.सौ. सिताताई बनसोड, नगरसेविका पदमीन अक्का शिंदे,राजू इनामदार,जलालभाई इनामदार व पञकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत त्यांनी केज शहरातील मोक्याची जिरायत खात्याची जागा केज नगरपंचायतला महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शिफारशी नुसार हस्तांतरित झाली असल्याची माहिती दिली.केज शहरातील व्यापाऱ्यांना यामुळे व्यापारी संकुलाच्या माध्यमातून स्वस्त दरात नगरपंचायत कडून गाळे व दुकानासाठी जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केज शहरातील नागरिकांची व व्यापारी वर्गांची ही अनेक दिवसापासून प्रमुख मागणी होती.यामुळे केजशहरात जागोजागी गटनेते डॉ.हारूणभाई इनामदार,नगराध्यक्षा डॉ.सौ.सिताताई बनसोड यांचे जागोजागी स्वागत करण्यात आले.

फलोत्पादन विभागाची जागा केज नगरपंचायत ला वर्ग व्हावी म्हणून स्व.विमलताई मुंदडा, खा.सौ.रजनीताई पाटील, खा.बजरंगबप्पा सोनवणे,जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा काकाजी, जेष्ठ नेते रमेशराव आडसकर, अंकुश अण्णा इंगळे, सर्व पक्षीय नगरसेवक, पञकार बांधव व केज शहरातील नागरिकांनी मोलाचे योगदान दिल्याचे गट नेते डॉ. हारुणभाई इनामदार यांनी नमूद केले. लवकरच बीडजिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून जागा अधिग्रहित करून सदरील जागेवरील एक अतिक्रमणे हटवून त्या जागी भव्य व्यापारी संकुल उभा केले जाईल असा विश्वास गटनेते डॉ.हारुणभाई इनामदार यांनी व्यक्त केला.

केज नगरपंचायतला महाराष्ट्र शासनाच्या या निर्णया मुळे 100 बाय 1000 स्क्वेअर फुट,दहा एकर चाळीस आर क्षेत्र जागा क्रीडा संकुलासाठी व इतर कामासाठी मिळाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या वरील निर्णयामुळे केजच्या विकासात मोलाची भर पडणार आहे हे निश्चितपणे दिसणार आहे.केज शहरातील नागरिकांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे तसेच नगराध्यक्षा डॉ. सौ.सिताताई बनसोड, गटनेते डॉ.हारुणभाई इनामदार यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!