
केज/प्रतिनिधी
जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [माध्यमिक विभाग ] या शाळेतील खेळाडूंनी दि.१३ ते १५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान शिर्डी या ठिकाणी पार पडलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.या स्पर्धेमध्ये तांदळे अक्षदा अमर हिने राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सर्वतृतीय येण्याचा बहुमान मिळवला. तिला ब्रॉन्झ मेडल व प्रशस्तीपत्र मिळाले.तसेच हावळे मैथिली कैलास हिने राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेतील सहभागी प्रमाणपत्र मिळाले.
वरील यशस्वी खेळाडूंचा तसेच तायक्वांदो स्पर्धेचे प्रशिक्षक तथा मार्गदर्शक बन्सी राऊत यांचा जीवन विकास शिक्षण मंडळ केज संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, सचिव जी.बी.गदळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे,शाळेतील क्रीडाशिक्षक श्रीकिशन नेहरकर या सर्वांच्या उपस्थितीत पालकांसह सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले.


