सामाजिक

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात विविध सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न.

केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे ९ मे २०२६ रोजी महाराणा प्रताप जयंती,कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी,संतचोखामेळा पुण्यतिथी संपन्न झाली. यावेळी व्याख्यान, परिसंवाद,चर्चासत्र,गीत गायन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड हे होते. प्रमुख व्याख्याते म्हणून आनंद भैय्या गायकवाड, बाळासाहेब गायकवाड यांची थोडक्यात व्याख्याने झाली.

परिसंवादात पांडूरंग गायकवाड,संजय सोनवणे,आनंद भैय्या गायकवाड यांनी सहभागी होवून मार्गदर्शन केले. चर्चासत्रात सेवानिवृत्त मुख्याध्यापक छगन गायकवाड,बंडू पौळ, आनंद भैय्या गायकवाड यांनी सदभागी होऊन मार्गदर्शन केले.गीत गायन कार्यक्रमात शिवम गायकवाड,वेदिका गायकवाड, प्रतिक पानढवळे यांच्यासह विद्यार्थांनी सहभागी होवून गीतगायन केले.

दिनांक ७ मे २०२६ रोजी रविंद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी करण्यात आली.तर दिनांक ६ मे २०२६ रोजी राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!