सामाजिक

वैद्यनाथ फंड रद्द करण्याचे आदेशाची तात्काळ. अमलबजावणी करा-वसंत मुंडे 

बीड/प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या शेतीमाला च्या पट्टीमधून वैद्यनाथ फंड वसूल करू नये असे आदेश असूनही कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वैजनाथ मार्फत कारवाई केली जात नसल्यास शासनाकडे तक्रार दाखल करणार असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी सांगितले पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दि.२० डिसेंबर २०१४ ला शेतकऱ्याकडून कोणत्याही सेवा शुल्क वसूल न करण्याची आदेश दिलेले आहेत.

परंतु परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कारवाई केली जात नाही. शेतकऱ्याच्या शेती मालाच्या खरेदी विक्रीच्या बाजार समितीच्या पट्टीमधून वैद्यनाथ फंड ०.६ पैसे वसूल केला जातो.बाजार समितीच्या सहकार्याने वैद्यनाथ मंदिराकडून फंड वसूल केला जातो. लायसनच्या वेळेस बाजार समितीकडून वैद्यनाथ फंडाच्या बाबतीत व्यापाऱ्याची अडवणूक केली जाते.

सहाय्यक निबंधक परळी व जिल्हा उपनिबंधक बीड हे राजकीय दबावा खाली काम करत असून शासनाच्या आदेशाची नियमानुसार पालन करीत नाहीत त्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठा त्रास परळी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून वैद्यनाथ फंडाच्या नावाखाली होत आहे. महाराष्ट्र मध्ये एका ही बाजार समितीकडून अतिरिक्त फंड वसूल केला जात नाही.बाजार समितीच्या कायद्यात तरतूद नाही परंतु शासनाचे वेळोवेळी आदेश देऊनही जिल्हा उपनिबंधक व कृषी उत्पन्न बाजार समिती नियमाचे पालन करीत नाही असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!