
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संस्कार इंग्लिश स्कूल मध्ये शनिवारी सकाळी १० वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याविषयी सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील ग्रामीण भागातील नामांकित श्री संस्कार इंग्लिश स्कूल मध्ये शनिवारी सकाळी १० वाजता स्त्री शिक्षणाचे शिल्पकार महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवन चरित्रावर सर्व उपस्थित मान्यवरांनी गौरोवोद्गागार काढले.
यावेळी सरपंच सुनील बापु देशमुख,श्री संस्कार इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष अनिल गलांडे,ग्राम पंचायत सदस्य बालाजी राऊत,रामभाऊ गलांडे, दत्तात्रय कांबळे,शाळेच्या प्रिन्सीपल सिमा फुटाणे शिक्षीका कोमल कापरे, आरती आचार्य,रेश्मा गायकवाड,प्रियंका शिंदे, वैष्णवी काळे,प्रिती गाते, मनिषा कापरे,अर्चना सपाटे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



