सामाजिक

संविधान एकता युवा मंच तर्फे केजमध्ये भव्य भिम जन्मोत्सव कार्यक्रमांचे आयोजन ; पहाट परिवर्तनाची भिमगितांचा बहारदार कार्यक्रम, आवाज आपल्या कलाकारांचा सुरेल संगीत गीतांचा नजराणा, निबंध स्पर्धा,चित्रकला, वकृत्व स्पर्धां,सांस्कृतिक कार्यक्रम,वस्तीगृह निवासी विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप, व्याख्यान व स्नेेह भोजन

केज/प्रतिनिधी

संविधान एकता युवामंच, कानडीरोड केज यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने शालेय प्राथमिक व माध्यमिक गटासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,तसेच गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि.१२ एप्रिल रविवार रोजी विद्रोही कवी हेमंत सौंदरमल प्रस्तुत परिवर्तनवादी भिमगीतांचा “पहाट परिवर्तनाची” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दि.१३ एप्रिल सोमवार रोजी “आवाज आपल्या कलाकारांचा” या सदाबहार फिल्मी व सुप्रसिद्ध भिमगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. दि.१४एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन,पंचशील ध्वजारोहण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर विचारमंथनाचा कार्यक्रम होणार आहे.यावेळी डॉ. ऋतुजा मुंडे या प्रमुख व्याख्याता म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या भव्य कार्यक्रमाला केज व तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, दलित चळवळीतील कार्यकर्ते,तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.विशेष म्हणजे स्नेहभोजनाचे ही नियोजन असल्याने सर्व मित्रपरीवारास आग्रहाचे निमंत्रण संविधान एकता युवा मंच, संयोजन समिती कडून देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!