केज येथे तीन सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव व निरोप समारंभ संपन्न

केज/प्रतिनिधी
दि.०४ एप्रिल रोजी केज तालुक्यातील केज केंद्रातील तीन शिक्षकांचा एकाच वेळी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना निरोप समारंभ देण्यात आला. आश्रुबा सोनवणे,हनुमंत अंजान व दिगंबर गिरी हे शिक्षक एकाच वेळी सेवानिवृत्त झाल्यामुळे केज येथील विठाई मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.खा.बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तिन्ही सेवा निवृत्त उत्सवमूर्तींना निरोप समारंभ देण्यात आला.
आश्रुबा सोनवणे हे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात असत.त्यांनी गटसाधन केंद्र केज,येथे साधन व्यक्ती म्हणून,लव्हूरी केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून, केज केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून तसेच अनेक प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडल्याने कार्यालयाच्या वतीने वरील तिन्ही उत्सवमूर्तींना एकाच वेळी सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गट शिक्षणाधिकारी सुनील केंद्रे हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणूनखा.बजरंग बप्पा सोनवणे,श्रीमती सारिका बजरंग सोनवणे,भाई मोहन गुंड,दत्तात्रय चाटे इत्यादी मान्यवर व शिक्षक आणि पाहुणे तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविकपर भाषणात आश्रुबा सोनवणे म्हणाले आम्ही गरीबांच्या लेकरांना प्रामाणिकपणे शिकविले शैक्षणिक काम केले म्हणूनच आमची लेकरे चांगल्या पद्धावर नोकरी साठी गेले.सर्वकाही प्राप्त केले आता फक्त समाजकार्य करण्यासाठी आयुष्य घालवायचे असे त्यांनी यावेळी सांगितले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला.



