सामाजिक

केजकरांना मोठा दिलासा! आमदार नमिताताई मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश,केज सब-स्टेशनला अतिरिक्त ५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर प्राप्त

केज/प्रतिनिधी

केज शहर आणि परिसरातील अनेक गावांमधील वीज पुरवठ्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटण्याच्या मार्गावर आहे.आमदार नमिताताई मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केज येथील मुख्य वीज उप केंद्रासाठी (सब-स्टेशन) आज ५ एमव्हीए क्षमते चा अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर दाखल झाला आहे.यामुळे केज शहरासह तांबवा, पिसेगाव आणि सोनिजवळा याभागांतील वीज पुरवठा आता अधिक सुरळीत आणि सक्षम होणार आहे.

या गावांचा वीज प्रश्न सुटणार

गेल्या काही काळापासून केज परिसरातील उप केंद्रावर लोड वाढल्या मुळे वारंवार वीज खंडित होणे किंवा कमी दाबाने वीज मिळणे अशा समस्यांना नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत होते. यांचा प्रामुख्याने पुढील गावांना याचा मोठा लाभ होणार आहे केज शहर, तांबवा,पिसेगाव, सोनिजवळा.आमदार नमिताताई मुंदडा यांनी यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे विजेच्या लपंडावामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यास, शेतकऱ्यांची सिंचन कामे आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होत होते.ही बाब लक्षात घेऊन आ. नमिताताई मुंदडा यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आणि संबंधित मंत्रालयाकडे केज उपकेंद्राची क्षमता वाढवण्यासाठी वारंवार मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून आज हा नवीन ट्रान्सफॉर्मर दाखल झाला आहे.

नागरिकांना आणि बळीराजाला अखंडित वीज मिळणे हा त्यांचा हक्क आहे.केज परिसरातील वाढत्या विजेच्या मागणीचा विचार करून हा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतला आहे. लवकरच याचे इन्स्टॉलेशन पूर्ण होऊन गावकऱ्यांचा विजेचा प्रश्न निकाली लागेल.

आ.नमिताताई मुंदडा आमदार,केज विधानसभा

काय होणार फायदा?

१.अखंडित वीज पुरवठा अतिरिक्त क्षमतेमुळे ओव्हरलोडची समस्या कमी होईल.

२.व्होल्टेजमध्ये सुधारणा घरगुती उपकरणे आणि शेतीचे पंप व्यवस्थित चालतील.

३.शेतकऱ्यांना दिलासा पिकांना पाणीदेण्यासाठी रात्री-अपरात्री होणारा विजेचा व्यत्यय कमी होईल.

हा ट्रान्सफॉर्मर उपकेंद्रात दाखल होताच परिसरातील नागरिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत आमदार नमिताताई मुंदडा यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!