सामाजिक

हैद्राबाद गॅझेट रद्द करण्यात यावे,बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप तात्काळ थांबवावे यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने केज तहसील कार्यालयावर मोर्चा, तहसीलदार राकेश गिड्डे यांना दिले निवेदन 

केज/प्रतिनिधी

सकल ओबीसी समाज केजच्या वतीने दि.9 सप्टेंबर 2025 रोजी केज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. हैद्राबाद गॅजेट रद्द करा बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप तात्काळ  थांबवा एक लाख रुपये देऊन प्रति कुणबी प्रमाणपत्र वाटप रेटने मोठ्या प्रमाणात बोगस कुणबी प्रमाण पत्र वाटपाचे काम आधी पासून सुरू आहे. खाडाखोड करून कुणबी नोंदणी झालेली आहे .

शासनाने तात्काळ कारवाई करावी व त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप थांबवावे या जीआर विरोधात सकल ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला मराठा समाज हा बहुसंख्येने महाराष्ट्रात एक नंबरचा समाज आहे व तो आर्थिक मागास नाही हैद्राबाद गॅजेट मध्ये मराठा व कुणबी ही वेगवेगळी जात आहे खरा कुणबी समाज आधीचओबीसी मध्ये आहे गोरगरीब ओबीसी समाजाचे शैक्षणिक,सामाजिक व राजकीय आरक्षण लुबाडायचा हा प्रयत्न काही राजकीय पक्ष व पुढारी करत असून आता ओबीसी समाज शांत बसणार नाही.

जोपर्यंत जीआर रद्द होत नाही तोपर्यंत मोठ्या ताकदीने समाज रस्त्यावर उतरत आहे. दि.9 सप्टेंबर रोजी सकल ओबीसी समाजा च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व सरकार ने काढलेला जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाजाचे बांधव उपस्थित होते यावेळी समता परिषदेचे सरचिटणीस अँड. सुभाष भाऊ राऊत यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!