सामाजिक

नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर येथे मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय बॅगचे वाटप करण्यात आले

पाटोदा/प्रतिनिधी

इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास,अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री मा.ना. अतुलजी सावे साहेब यांचा वाढदिवस दिनांक २६ फेब्रुवारी रोजी आहे. परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहिरात बॅनर, पोस्टर किंवा होर्डिंग लावू नयेत, असे आवाहन मा.ना. अतुलजी सावे साहेब यांनी केले आहे.

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महात्मा फुले युवा दलाच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठरविले की वाढदिवसानिमित्त होणारा बॅनर व जाहिरातीवरील खर्च टाळून तो निधी गोरगरीब व अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तसेच अनाथ आश्रमातील मुलांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.

त्या अनुषंगाने आज नाथ निवासी आश्रम शाळा नायगाव मयूर ता. पाटोदा जि. बीड येथे विद्यार्थ्यांना शालेय बॅगेचे वाटप करण्यात आले.यावेळी महात्मा फुले युवा दल प्रमुख अँ‌‌‌ड सतीश शिंदे व पाटोदा तालुका प्रमुख गणेश मोहळकर,युवा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश वनवे जेष्ठ मार्गदर्शक शिवाजी दादा मोहोळकर व इतर मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!