महावितरणच्या महिला अधिकारी,आणि वीज बील थकीत दिव्यांग ग्राहकाच्या परस्पर विरोधात तक्रारी दाखल

केज/प्रतिनिधी
केज शहरातील वडार वस्ती बजरंगनगर भागात राहणारे वीजबिल थकीत दिव्यांग ग्राहक विनायक गंगाधर लोंढे तसेच महा वितरणच्या कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांनी केज पोलिसात परस्पर विरोधात तक्रारी दिल्यावरून एकमेकां विरुद्ध एन सी आर दाखल झाल्या आहेत.
विनायक लोंढे याच्याकडे १६ हजार ९६० रुपये एवढे महावितरण कंपनी चे विजेचे बील थकीत असल्यामुळे ते भरण्या साठी व नवीन स्मार्ट मिटर बदलीकरण्यासाठी महावितरणचे पथक त्यांच्या घरी गेले असता थकीत वीज बिल व नवीन स्मार्ट मीटर बदलीस विरोध करीत महावितरणच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धमकी दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यासह लाईनमन यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.तरदिव्यांग ग्राहकाने महावितरणचे अधिकारी – कर्मचारी मागासवर्गीय व दिव्यांग ग्राहकांना त्रास देत असल्याचा आरोप करीत महावितरण कंपनीच्या कार्यालया बाहेर राष्ट्रीय महामार्गांवर झोपून रस्ता रोको आंदोलन केले.व महावितरणच्याअधिकारी कर्मचाऱ्यांवर अॕट्रॉसिटीचा गून्हादाखल करण्याची मागणी केली.
दलितमहासंघाचे केज तालुकाध्यक्ष असलेल्या विनायक लोंढे यांच्या आंदोलनाला बहुजन विकास मंचाचे तालुका अध्यक्ष लखन हजारे यांनीही पाठिंबा दिला.व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याची मुजोरी मोडून काढण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.
आमच्यावर पोलिसांचा अन्याय.
विनायक लोंढे यांनी स्मार्ट मीटर बसविण्या साठी गेलेल्या कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ केली.त्यानंतर लोंढे व त्यांच्या पत्नीने कार्यालयात घुसून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देखील अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे.यावारंवार होणाऱ्या प्रकारामुळे कर्मचाऱ्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन भीती निर्माण झाली आहे. पोलिसांच्या एका कॉल वर आमचे कर्मचारी धावत जाऊन विद्युत पुरवठा वेळेवर दुरुस्त करतात.पण पोलिस आमची तक्रार नोंदवून घेत नाहीत.हा आमच्या वर अन्याय असल्याचे मत महावितरणच्या कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
महावितरणचे अधिकारी केज शहरात
दरम्यान महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता मनीष ढाकरे,यांनी केज येथे येऊन उप कार्यकारी अभियंता मीनाजुद्दीन सय्यद व कनिष्ठअभियंता शितल सय्यद यांची भेट घेवून घडलेल्याप्रकाराची सविस्तर माहिती घेतली व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज बिलाच्या वसुली बद्दल शितल सय्यद यांच्यासह त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले.परंतु या प्रकरणी सामान्यजनतेला वेठीस धरू नका अशा सूचना दिल्याची माहिती अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.दरम्यान या प्रकरणाची केज शहरात उलटसुलट चर्चा चालू आहे.



