प्रा.बबनराव आंधळे यांना मातृभुमी प्रतिष्ठान चा आदर्श पुरस्कार प्रदान

बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील सहकार आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचे असलेले योगदान पाहता,मातृभूमी प्रतिष्ठानने दिलेला हा आदर्श पुरस्कार त्यांच्या कार्याची यथोचित पावती आहे.संत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान, बार्शी रोड,बीड,मातृभूमी प्रतिष्ठान,बीड आयोजित ‘आदर्श सामाजिक कार्य पुरस्कार’ वितरण सोहळा बीड येथे आयोजित करण्यात आला.यावेळी
बीड जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक प्रा. बबनराव आंधळे सर यांना त्यांच्या सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संत भगवान बाबांच्या पावन भूमीत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हासोहळा सरांच्या कार्याचा गौरव करणारा ठरला.
बीड जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक प्रा. बबनराव आंधळे सर यांना सामाजिक कार्या बद्दल मातृभूमी प्रतिष्ठान च्या वतीने आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला.बार्शी रोडवरील संत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला.शिक्षणा सोबतच सहकार आणि सामाजिक प्रश्नांची जाण ठेवून कार्य करणाऱ्या सरांच्या शिरपेचात या निमित्ताने मानाचा तुरा रोवला गेला आहे.या बद्दल प्रा.बबनराव आंधळे सर यांचे अभिनंदन होत असुन पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



