न्यायसामाजिक

मालेगाव घटनेचा केज येथे निषेध,आरोपीला कठोर शासन करण्याची सुवर्णकार व के.वि.सं.स ची मागणी

केज/प्रतिनिधी

मालेगाव नजीक डोंगराळे येथील साडेतीन वर्षाची चिमुकली यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर अत्याचार करून तिची निर्दयपणे क्रूर हत्या करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी द्या अशी मागणी करत येथील केज तालुका सुवर्णकार संघटना व केज विकास संघर्ष समितीच्या वतीने केज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात पुढे म्हटले आहे की,अलीकडील काळात दहा वर्षाखालील चिमुकल्या मुलीवर अत्याचाराचे व हत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. गुन्हेगारांवर कसलाच वचक राहिलेला नाही. राज्य व केंद्र सरकारने जनतेच्या भावना व मागणी लक्षात घेऊन अशा विशिष्ठ संवेदनशील प्रकरणात विशेष कायदा करून आठ दिवसाच्या आत दिवसरात्र तपास व चौकशी करून दोषी असल्यास गुन्हेगाराला आठव्या दिवशी फाशी देण्यात यावी असे झाले तरच अशा प्रकारच्या घटना थांबतील व जनतेचा कायद्यावरील विश्वास कायम राहील. मात्र असे न होता अशा गुन्ह्याचा तपास व न्यायिक प्रक्रिया वर्षानुवर्षे चालत राहते. त्यामुळे अशा घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत.

आता लोकांचा संयम तुटू लागल्याने व कायद्या वरील विश्वास उडत चालल्याने लोक आता कायदा हातात घेऊन पोलिसांचे कडे तोडून न्यायालयात परिसरात घुसू लागले आहेत जे मालेगाव येथे घडले. आता शासनाने जनतेच्या संयमाची वाट न पाहता तात्काळ अशा प्रकरणा तील आरोपीला आठ दिवसात फाशीदेण्यासाठी कायदा व प्रक्रिया बदलावी अशी मागणी केज वासियांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी केली आहे.

यावेळी केज तालुका सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष गोविंद कणसे, माजी अध्यक्ष मोहनराव धपाटे,केज विकास संघर्ष समितीचे नासेर मुंडे यांच्या सह सराफा संघटनेचे पदाधिकारी प्रवीण भोसले,लखन वाकळे, मधुकर निंगुळे, सचिव प्रकाश कामाजी, सचिन वेदपाठक,संदीप नाईकनवरे,युवराज बुदगुडे,राजेंद्र पंडित, विकास तरकसबंद,संजय रोडे,संतोष नेमटे, मफिजूल इस्लाम,दत्ता दीक्षित,शफिफुल शेख, मनोज कदम,संकेत धस यांच्यासह इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!