वाणिज्यसामाजिक

मल्टी कमोडिटी एक्सचेंज एम.सी.एक्स मार्फत श्री साई आय.टी.आय. कॉलेज वैराग येथे स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न

वैराग/प्रतिनिधी

श्री साई आय.टी.आय. कॉलेज वैराग येथे भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड अर्थात (सेबी) तसेच एम. सी.एक्सच्या माध्यमातून आय.टी.आय च्या विद्यार्थ्यां साठी एक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य श्री.शाम गोवर्धन सर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून (सेबी) तसेच एम.सी.एक्स चे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर श्री.गणेश चौधरी सर यांनी उपस्थितविद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले.

यात त्यांनी विद्यार्थ्यांना फायनान्शियल मार्केट्स, कमोडिटीचे प्रकार, जागतिक स्तरावर सक्रिय असलेल्या कमोडिटीज, वेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट,कमोडिटी, इक्विटी मध्ये असेल असलेला फरक,डिमॅट अकाउंट, तसेच सेबीच्या सारथी ॲप चे महत्व,मार्गदर्शन केले.तसेच गुंतवणूक करत असताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी व फसवणूक करणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्या साठी कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांनी विशेष प्रयत्न केले.या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!