शैक्षणिकसामाजिक

माऊली बालसदनची जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालक महोत्सवात नेत्रदीपक कामगिरी 

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग, अंतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी बालगृहा तील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यात सांघिक भावना व निर्माण होऊन एकमेकांविषयी बंधुभाव, सहकार्य या भावना निर्माण होण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जात असते.

याच उद्देशाने जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव पांडुरंग बालक आश्रम बीड रोड केज येथे दिनांक १६ जानेवारी ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यातआला होता.या महोत्सवातील स्पर्धेत माऊली विद्यापीठ केज संचलित,माऊली बालसदन मांगवडगाव ता. केज जि.बीड येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नेत्रदीपक यश संपादन केले.या स्पर्धेत चि.निर्मळ आदित्य बंडु याने लांब उडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक व चि.सोनवणे सार्थक संजय याने चेस या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.मनोज ससे साहेब, जिल्हा महिला व बाल विकास पर्यवेक्षक श्री. मंगेश जाधव,बाल कल्याण समिती अध्यक्ष मा. श्री. अशोक तांगडे, श्री.राजहंस सर, उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे अंबाजोगाई,केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड,केज नगरपंचायत चे गटनेते श्री.हारुणभाई इनामदार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेतील विद्यार्थ्यांना माऊली बालसदनचे अधिक्षक श्री. मनोज पाटील यांनी मार्गदर्शनकेले.विद्यार्थ्यांनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल माऊली विद्यापीठ केजचे सचिव श्री.आदित्य दादा पाटील, संस्थेच्या संस्थापिका मा. खासदार सौ.रजनीताई पाटील,संस्थाध्यक्ष श्री. अशोकराव पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.प्रताप मोरे सर,भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालय मांगवडगाव शाळेचे मुख्याध्यापकश्री.सोनवणे सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!