परमार्थ केल्याने सुख, समाधान प्राप्त होते. – मा.आ.केशवराव आंधळे

केज/प्रतिनिधी
दि.१९ जानेवारी २०२६ रोजी केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथुन प्रथमच जीवाचीवाडी ते पंढरपुर पायी दिंडी सोहळा प्रारंभ सुरू करण्यात आला.या दिंडीला निरोप देण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुखपाहुणे म्हणुन माजी आमदार श्री.केशवराव दादा आंधळे म्हणाले की, यावर्षी प्रथमच जीवाची वाडी ते पंढरपुर पायी दिंडी सोहळा सुरू होत आहे.मनुष्याने परमार्थ केला तर खरोखरच सुख आणि समाधान मिळते.
स्वातंत्र्य सैनिक कै. भगवान काळे यांच्या आत्म्यास खरोखरच शांती लाभेल असे धार्मिक उल्लेखनीय कार्य त्यांचे तिन्ही चिरंजीव पद्माकर, आण्णासाहेब व नामदेव यांनी केले आहे.यावेळी ह.भ.प.श्री.जालींदर महाराज नेहरकर यांच्या किर्तनाचे आयोजन केलेले असुन या सुवर्ण संधीचा भावीकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.काळे कुटूंब व ग्रामस्थांनी माजी आमदार केशवराव दादा आंधळे यांचा हृदय सत्कार करून त्यांचे आभार मानले.



