शासकीय तंत्रनिकेतन बीड या संस्थेत वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

केज/प्रतिनिधी
शासकीय तंत्रनिकेतन बीड या संस्थेत दि.२७ फेब्रुवारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन अविष्कार २०२६ चे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून मा.श्री. अतुल चव्हाण (मुख्य अभियंता,सा.बां.विभाग छत्रपती संभाजीनगर परिमंडळ) व प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. रविंद्र जोगदंड (उपायुक्त, स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजीनगर) यांची विशेष उपस्थिती लाभली सदरील कार्यक्रमात विदयार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना श्री. अतुल चव्हाण यांनी मोबाईल / स्मार्टफोनचे फायदे व तोटे यांची माहिती दिली व त्याचा योग्य वापर करण्या सबंधी सांगितले.श्री. रविंद्र जोगदंड यांनी थोर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज व स्वा. वि.दा. सावरकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन स्वतः ची जडणघडण करावी असे सांगितले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.ए.के.वाघमारे यांनी मराठी भाषा गौरव दिनाबद्दल माहिती दिली व विदयार्थ्यांना प्रात्यक्षिक आणिकौशल्य आधारीत अभ्यासावर भर देण्याचे आवाहन केले.
संस्थेचे जिमखाना उपाध्यक्ष श्री.डी.जी. वाघ यांनी प्रास्ताविक करताना जिमखाना अंतर्गत वर्षभरात केलेल्या विविध कार्यक्रमाचा आढावा सादर केला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.श्री. यु.व्ही.बनसोडे यांनी केले.यानंतर संस्थेतील विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शेलापागोटे, अंताक्षरी, विविध कला गुणदर्शन यांसारख्या कार्यक्रमात सहभाग घेऊन सर्व कार्यक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले. दुसऱ्या दिवशी दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी संस्थेत माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.संतोष लड्डा(उद्योजक,छत्रपती संभाजीनगर),उपाध्यक्ष श्री.एम.के.निनाळे,सचिव श्री.पवन रामदासी तसेच माजी विद्यार्थी सागर वडगावकर(उद्योजक), रुपेश जाधव(IES, भारतीय रेल्वे),मोमीन एम.ए.(उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा), अंकिता कुलकर्णी, मनीषा रोंढे,राहुल खडके (प्राचार्य आदित्य पॉलिटेक्निक),स्वप्नील निंबाळकर,संदीप शेटे (उद्योजक),प्रदीप नाळे (भाभा ऑटोमिक रिसर्च) व इतर माजी विद्यार्थी उपस्थित होते.याप्रसंगी सर्व माजी विदयार्थी यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला,आपले मनोगत व्यक्त केले व मार्गदर्शन केले.तसेच संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.या दिवशी संस्थेतील गुणवंत विदयार्थ्यांचे सर्व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देवून कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री.एस.एस. सिरसाट यांनी केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.ए.के.वाघमारे यांनी केला. आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी समन्वयक श्री एस.व्ही. देशमुख यांनी केले. सदरील कार्यक्रमानंतर संस्थेतील सर्व माजी विद्यार्थी,आजीविदयार्थी, विभागप्रमुख,शिक्षक, कर्मचारी यांच्यासाठी स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व कार्यक्रमाचे समिती प्रमुख,सदस्य व अधिकारी,कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.



